पहिली बेटी धनाची पेटी म्हणवता आणि त्याच लेकराला संस्कारांत बांधून ठेवता ?नवरात्रीत नऊ दिवस उपवास कर ग बाई असं आवर्जून सांगता, पण नराधमाच्या उपाशी नजरा कश्या ठेचायच्या हे नाही शिकवता आलं कधी ?मुलीला डोक्यावर पदर घ्यायला जरूर शिकवा,पण वेळेला त्याच पदरानं स्वतःच्या अब्रूसाठी कुणाचा गळा आवळायची वेळ आली तर त्यासाठी तिला सामर्थ्य सुद्धा द्या. हे षंढयुग आहे, इथं सारेच मान खाली घालुन जगतायत, जगण्यासाठी किंमत मोजावीच लागते, मुलींच्या सौंदर्यावर खर्च करण्यापेक्षा, आत्मनिर्भर होण्यासाठी पैसा जाऊद्या, स्वतःच जरी रक्षण करता आलं पोरीला तरी हजारो निर्भया जन्माला येण्यापासून वाचतील..आधी मुलाला स्त्री चा आदर करायला शिकवा आणि स्त्री ला स्वतःचा स्वाभिमान जपायला..नवरात्रीत हे चांगले दिवस बघा आणि पोरीबाळींवर छत्रपतींचे संस्कार होऊद्यात !जय भवानी !