शेपूट जाळलं रावणानं, म्हणून त्याची लंका पेटली,अंजनीच्या लेकानं मात्र रामाची मर्जी जिंकली.रोज काय ना काय तरी आडवं येणारच इथं,म्हणून प्रत्येकानं तिथं आपली पाठण जपली.आज काय तर दोन येळच्या भाकरीला गरीब झाली नौकरी,पण थाटात अजून उभा हाय त्यो शेतकरी..त्यानं एक शिकीवलं मर्दा की काम नाय केलं तर माणूस असल्याचं लक्षण ते काय,आन एवढुश्या संकटाला घाबरलास तर साला तुझा जगुन उपयोग तरी काय ?आरं आकाश ठेंगनं पडलं तुझ्यासाठी,तू एकदा उडून तरी बघ..येऊ दे की कितीबी भुतं , पण स्वतःसाठी जगुन तर बघ !
Nice Story !!!
Superb