पैसा तेथे चमत्कार आणि त्यालाच नमस्कार !
रोज घर सोडून करोडो माणसं बाहेर पडतात, मनाविरुद्ध मन मारून काम सुदधा करतात,
ते फक्त त्या घरातल्या माणसांसाठी सुख आणि त्यासाठी लागणारी किंमत मोजायला..
आयुष्य जातं निघून काम करण्यात, आणि त्यात जगणं राहून जातं.. वय वाढतं तसं जबाबदारी वाढते, प्रौढपण येतं.. आणि ह्या सगळ्यात स्वतःला आरशात बघितलं की दिसतं निस्तेज झालेलं रूप जे दुसऱ्यासाठी आयुष्यभर सोसत बसलं होतं..
हे रूप स्वतःचं नसतंच कधी..ते दमलेल्या बापाचं आणी सोसलेल्या आईचं असतं.. आजच्या तरुण पिढीला ते सहज सोप्प सोडून देण्यात वाईट वाटत नाही..पण स्वतःवर ती वेळ 30 वर्षानंतर येईल हे विसरून जातो..मान्य वाईट वेळ वाटून घेता येत नाही, पण सोबत करण्याइतपत तरी स्वतःला लायक बनवावं प्रत्येकाने..तुमची कमाई ही पहिली तुमच्या जन्मदात्यांच्या हक्काची..त्यांच्या पेन्शन वर जगणारी औलाद म्हणजे निव्वळ बांडगुळ जमात..तुम्ही कष्ट करता त्या तुमच्या कामाचे पैसे मिळतात तुम्हाला, पण ते तुम्ही जो पर्यंत करू शकाल तोपर्यंतच..एकदा तुमचा थकवा सुरू झाला की मग काम आणि पैसा दोन्ही लांब पाळतात..आयुष्य असच संपत जातं..आधार लागतो तेव्हा पण तेव्हाच नेमकी ही पोरं जबाबदारी आणि कर्तव्य दोन्ही विसरतात..नकोसं होतं आपलं दुखणं.. पण हा भ्रमाचा भोपळा आज ना उद्या सगळयांचाच फुटेल..
तेव्हा मात्र चार खांदेकरी आणि मोजकेच रडणारे डोळे ही कमाई मागे राहील !
©Nilsblogg