कामाच्या ठिकाणी लफडी करणारी पोरं म्हणजे ३५ % काठावर पास होऊन गावभर बॅनरबाजी करत मिरवणारे महाभाग !
बाहेर कुणी विचारत नाही आणि इथे कुणाला फरक पडत नाही. आधी बरं होतं जरा,,एकमेकांना बोलायला महिनो न महिने जायचे. पहिल्यांदा ते अडखळत बोलणं, बोलताना मधेच शब्दांचा विसर पडणं, तिला पाहून स्वतःलाच धीर देत सावरणं, अलगद केसांचा भांग नीट करून मळलेला शर्ट थोडा सावरत तिच्या समोरून उगाचच फेऱ्या मारत राहणं .
हे सगळं हळू हळू फुलत जायचं.. नाती जगायची कला अवगत होती सगळ्यांनाच.. समोरची मुलगी आपल्याबद्दल काय विचार करत असेल आणि आपण तिच्या पसंतीस कसे उतरू ह्यासाठीची धावपळ थोडी वेगळीच होती. गंमत म्हणजे तिच्याच मैत्रिणीकडून राखी बांधून घेऊन तिच्याकडूनच काम करून घेण्यात वेगळीच मज्जा होती.. मोबाइल आणि त्यातली आप्लिकेशन्स मुळे कनेक्टिव्हिटी वाढली पण कम्युनिकेशन कमी झालं. वाट बघणं आणि त्यातली गंमत हरवली काळाच्या ओघात. आधी कागदावर आपल्या मनातल्या गोष्टी लिहून तिच्या मैत्रिणीकडे पाठवायच्या, आणि मग पुढचे कितीतरी दिवस त्या पत्राच्या उत्तराची वाट बघत मन सैरभर व्ह्यायच.
व्हाट्सअप च्या ब्लू टिक ने ती वाट बघायची मजाच घालवली.. उलट आता तर तिने मेसेज वाचून ठेवला पण रिप्लाय आला नाही म्हणून सैरभैर होणारी नाती, अवलकाळी येणाऱ्या पावसा सारखी एका मागून एक कोसळू लागली..
सोसिअल लाईफ असावी पण सोसल तेवढीच असावी.
आज नाती स्वस्त झालीत, हिशेब लगेच होतो आणि अँप्लिकेशन्स वर तर अक्षरशः बाजार मांडला जातो..
आपली निवड हि आपल्या आयुष्याच्या प्रवासातली सोबत म्हणून गृहीत धरून शोधायला गेलात तर अर्थपूर्ण नाती तयार होतील..
नाहीतर फेसबुक वर फेस गाळणारी माणसं लाखोंच्या संख्येने उपलब्ध आहेत !
प्रेमात पडणं आणि त्यासाठीच धडपडत राहणं हा भाग वेळेवर सोडून द्या आणि निवांत जे होईल ते जागून घ्या!